Wed, Sep 18, 2019 21:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय प्रवेश वटहुकूम पुढील आठवड्यात जारी!

वैद्यकीय प्रवेश वटहुकूम पुढील आठवड्यात जारी!

Published On: May 19 2019 1:43AM | Last Updated: May 19 2019 1:57AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम करण्यासाठी, राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यात दुरुस्ती केली आहे. हा वटहुकूम सोमवारी किंवा मंगळवारी जारी होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील एसईबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे 213 मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले होते. मराठा आरक्षण कायद्यातील तांत्रिक चुकांमुळे प्रवेश रद्द झाल्याने हे प्रवेश कायम करण्यासाठी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाने कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुपारी वटहुकुमाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर वटहुकूम राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला. मात्र, मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन शनिवारीही सुरूच होते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत 25 मे आहे.