Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतात ब्रेन स्ट्रोकच्या प्रमाणात प्रचंड वाढ

भारतात ब्रेन स्ट्रोकच्या प्रमाणात प्रचंड वाढ

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी 

देशात ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. शिवाय गेल्या काही वर्षांच्या तुलनेत स्ट्रोकमुळे होणार्‍या मृत्युंचे प्रमाण वाढले आहे, असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आपल्या अहवालात केला आहे. 

चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात दारूचे सेवन, अतिप्रमाणातील वजन तसेच लठ्ठपणा, तंबाखूचे सेवन इत्याही घटक नॉन-कम्युनिकेबल डिसीज जसे की स्ट्रोक होण्यासाठी कारणीभूत ठरतात. आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सातत्याने मदत केली जाते. कॅन्सर, मधुमेह, हृदयाचे आजार आणि स्ट्रोक या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रतिबंध कऱण्यासाठी सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राष्ट्रीय उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनशैलीतील बदल, आजारांचे वेळीच निदान आणि उपचार या गोष्टींबाबत जनजागृती कऱण्यात येणार आहे.

मागील काही वर्षात स्ट्रोकची प्रकऱणे वाढल्याचे दिसत आहे. शिवाय तरूणांमध्ये याचे प्रमाण जास्त पाहायला मिळते. याला कारणीभूक घटक म्हणजे चुकीची जीवनशैली, उच्च रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, लठ्ठपणा, अतिप्रमाणात दारूचे सेवन इत्यादी. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी करायचा असेल तर या गोष्टींवर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Tags : Mumbai, Massive increase in the proportion of brain strokes in India