Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घटस्फोटीत महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

घटस्फोटीत महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Published On: Dec 13 2017 2:36AM | Last Updated: Dec 13 2017 1:42AM

बुकमार्क करा

नालासोपारा : प्रतिनिधी

नालासोपार्‍यात राहणार्‍या एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अर्नाळा  पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल होताच अर्नाळा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरीत राहणारी घटस्फोटीत पीडित महिला व आरोपी हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. पिडीतेने घटस्फोट घेतला असल्याने ती पतीपासून  वेगळी राहत होती. दरम्यान पीडित महिला व गिरीशची फेसबुकवरून पुन्हा मैत्री जमली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

यानंतर लग्नाचे अमिष दाखवून  गिरीशने अनेकवेळा कळंब बीच, गोराई बीच, बोरिवली पश्चिम येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. अखेरीस पीडितेने लग्नाबाबत विचारले असता आरोपीने तिला स्पष्टपणे नकार दिला. 

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने अर्नाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. या तक्रारीवरून अर्नाळा पोलिसांनी  गुन्हा दाखल करत गिरीश गायकर याला रविवारी अटक केली. त्याला वसई न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डॉ.अभिजित पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.