Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी माणूस, हिंदुत्वासाठी भूमिका घेणारच

मराठी माणूस, हिंदुत्वासाठी भूमिका घेणारच

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:27AMमुंबई : प्रतिनिधी

या सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. उद्या तुम्ही म्हणाल, नाराज आहात तर सरकारमधून बाहेर पडा. ठीक आहे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, पण विचार करून आपण एक भूमिका घेत असतो. ज्यावेळी भूमिका घ्यायची त्यावेळेस स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसेना बेधडक भूमिक घेईल, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला.

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन परळ येथील शिरोडकर हायस्कूल येथे पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणूस एकत्र येत नाही, पण वृत्तपत्र विक्रेत्यांच्या माध्यमातून दाखविण्यात आलेल्या एकजूटीबद्धल समाधान व्यक्त करत सर्वांना धन्यवाद दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अपेक्षेला तडा जाऊ देणार नाही. संपूर्ण शिवसेना तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी माणसाच्या आवाजाला वाघाच्या डरकाळीचं बळ देण्याची आणि हिंदूंचा आवाज बुलंद करण्याची क्रांती शिवसेनाप्रमुखांनी केली. त्यात तखांद्याला खांदा लावून तुम्ही सामील झालात. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फेरीवाला धोरणात फेरीवाला कोण आणि वृत्तपत्र विक्रेते यातील फरक जर राज्यकर्त्यांनी समजून घेण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, दांगट न्यूजपेपर एजन्सीचे बाजीराव दांगट, मुरलीधर शिंगोटे, रोहिणी खाडीलकर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरि पवार, सुनील गोरे आदी उपस्थित होते.