Tue, Feb 19, 2019 21:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी विद्यापीठाच्या वांद्य्रातील जागेचा करार

मराठी विद्यापीठाच्या वांद्य्रातील जागेचा करार

Published On: Feb 28 2018 2:17AM | Last Updated: Feb 28 2018 2:02AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठासाठी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे महापालिकेची जागा तर ग्रंथाली या प्रकाशन संस्थेच्या कार्यालयासाठी माहीम टायकलवाडी  येथील जागेचा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

मराठी भाषेच्या विद्यापीठासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती ग्रंथालीने केली होती. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी सलग दीड वर्षे पाठपुरावा केला होता.  दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने अचानक ग्रंथालीला विद्यमान कार्यालयाची जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यावेळी साहित्यवर्तुळात खळबळ उडाली होती. 

मराठी भाषेवर अभिजात भाषेच्या दर्जाची मोहर लवकरच उमटेल. आम्ही त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टी केल्या असून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरवा करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी कोमसापच्या शिष्टमंडळासह साहित्यप्रेमींना दिली.