Thu, Jul 18, 2019 00:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण; अहवाल देण्यास आणखी ३ महिने लागणार: राज्य सरकार

मराठा आरक्षण; अहवाल देण्यास आणखी ३ महिने लागणार: राज्य सरकार

Published On: Aug 07 2018 2:23PM | Last Updated: Aug 07 2018 2:36PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर न्या.रणजित मोरे आणि न्या.अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली. 

राज्य सरकारने न्यायालयात दोनपानी प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य मागसवर्ग आयोगकडून पाच संस्थांकडून डेटा जमा करण्याचे काम पूर्ण झाले असून पाच सप्टेंबरपर्यंत सर्व डेटा आयोगाकडे येणार आहे. त्यानंतर आयोगाला अंतिम अहवाल देण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे रवी कदम यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल देण्यास ३ महिने लागणार 
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर 
५ सप्टेंबरपर्यंत माहिती घेण्याचे काम पूर्ण करणार 
मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात