Wed, Jan 23, 2019 19:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अहवालाची वाट कशाला बघता, मराठ्यांना आरक्षण द्या: शिवसेना (Video)

अहवालाची वाट कशाला बघता, मराठ्यांना आरक्षण द्या: शिवसेना (Video)

Published On: Jul 30 2018 2:46PM | Last Updated: Jul 30 2018 3:22PMमुंबई : प्रतिनिधी

मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशीही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आज आज ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र त्यासाठी सध्या ज्या समाजांना आरक्षण मिळाले आहे; त्यांच्या आरक्षणाना धक्का लावू नका, केंद्राकडे एकदाच सर्व समावेशक असा अहवाल सर्वानुमते पाठवा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. 

माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.  

उद्धव ठाकरे म्हणाले...
- राज्यकर्त्यांची प्रवृत्ती अशी झाली आहे की एक तर असा विषय आल्यावर कमिटी नेमतो किंवा तो विषय कोर्टाच्या अखत्यारीत आहे असं सांगतात.
- सगळ्यांनी एकत्र मिळून एकमतानं निर्णय घेऊन ती शिफारस केंद्राकडे पाठवावी.
-सर्वच समाजाच्या आरक्षणाच्या अहवालाबाबत शिफारस द्यावी.
- मराठा समाजासोबत इतरही समाजांच्या मागण्यांचा एकत्रित विचार व्हावा.