होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा!

पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा!

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

लोअर परळ येथील चित्रपटगृृृहात बाहेरचे पदार्थ नेण्यास बंदी केल्याने मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक होवून फिनिक्स मॉलमधील पीव्हीआर चित्रपटगृहातील मालकांशी हूज्जत घातली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  एक ऑगस्टपासून चित्रपटगृृृृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारने घेतला होता, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी मनसे कार्यकर्ते सोमवारी मुंबईत पडताळणी करत होती.

यामध्ये मनसे नेता संदिप देशपांडे यांच्या नेतृृत्वाखाली लोअर परळमधल्या फिनिक्स मॉलमधल्या पीव्हीआरमध्ये मनसे कार्यकर्ते चित्रपट पाहायला जाण्यासाठी, त्यांनी बाहेरुन खाद्यपदार्थ आणल्याने त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्याा मानसैनिकानी चित्रपटगृहामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केले होते. यावेळी पोलीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चित्रपटगृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारनं घेतला होता. अशी मािहिती दिली, परंतु याबाबत कोणतेही लेखी आदेश आमच्यापर्यंत आलेच नाहीत, असं पोलिसांनी सांगितले.