Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानखुर्दमध्ये 17 वर्षीय मुलीवर परिसरातील मुलाकडून लैंगिक अत्याचार

मानखुर्दमध्ये 17 वर्षीय मुलीवर परिसरातील मुलाकडून लैंगिक अत्याचार

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

मानखुर्द येथे एका सतरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून वीस दिवसांनी बलात्कारी अल्पवयीन मुलाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी सांगितले.

पोटात दुखत असल्याने या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला होता, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. जून महिन्यांत पिडीत मुलीला पोटात दुखत असल्याने भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती नऊ महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांना समजले होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती मानखुर्द पोलिसांना दिली होती. या घटनेनंतर या मुलीची जबानी नोंदवून पोलिसांनी बलात्कारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत वीस दिवसांनी एका सतरा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पिडीत मुलीने त्यानेच तिच्यावर दिड वर्षांपासून लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.