Wed, Jul 17, 2019 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंजुळा हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

मंजुळा हत्या प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बहुचर्चीत भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणातील तीन आरोपींचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. याआधी झालेल्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलाने अन्य तिघींचा जमीन अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.

दोन अंडी आणि पाच पावांच्या हिशोबावरून जेलमधील महिला अधिकारी मनीषा पोखरकर हिच्यासह वसीमा शेख, बिंदू नायकवडे, सुरेखा गुलवे, शीतल शेगावकर आणि आरती शिंगणे यांनी 23 जूनच्या सकाळी मंजुळाला विवस्त्र करत अमानुषपणे मारहाण केली होती. या मारहाणीतच मंजुळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल हत्येच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सहाही जणींना गजाआड करत तपासअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपी महिला अधिकारी पोखरकर हिच्यासह सहाही जणींनी जामिनासाठी सत्र न्यायलयात अर्ज केला होता. आरोपींच्या वतीने वकिलांनी घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत ते बघितले. त्यानंतर वकिलांनी पोखरकर हिच्यासह शेगावकर आणि शिंगणे यांचा जामीन अर्ज मागे घेतला होता. उरलेल्या तिघींच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने तिघींचाही जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपींना आणखी काही दिवस गजाआड रहावे लागणार आहे.