Wed, Nov 14, 2018 18:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खवल्या मांजर ४० लाखाला? ; दोघांना अटक (Video)

खवल्या मांजर ४० लाखाला? ; दोघांना अटक (Video)

Published On: Feb 23 2018 5:46PM | Last Updated: Feb 23 2018 5:51PMठाणे : प्रतिनिधी 

दुर्मिळ असलेले खवल्या मांजर विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली.  आज  ठाण्यातील गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ही कारवाई केली. 

याबाबत मिळालेल्या माहिातीनुसार, रायगड येथील दोन तरुण दुर्मिळ खवल्या मांजर विकण्यासाठी आले होते. या मांजराची विक्री तब्बल ४० लाख रूपयांना करण्यात येणार होती. पण विक्री होण्याआधीच ठाणे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी आहे का? याचाही तपास सुरू आहे. 

खवल्या मांजराची इतकी किंमत का? 

दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराबद्दलची माहिती लोकांनाच जास्त असेल. तोंडात एकही दात नसलेला हा प्राणी आकर्षक वाटतो. मुंग्या आणि त्यांच्या अळया खाऊन जगणारा हा सस्तन प्राणी दुर्मिळ होत चालला आहे. कॅन्सर सारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी मांजराच्या शरिरावर असलेल्येा खवल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या प्राण्याची तस्करी केली जाते.