होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा केंद्राच्या कार्यालयांना बंधनकारक

मराठी भाषा केंद्राच्या कार्यालयांना बंधनकारक

Published On: Dec 06 2017 1:54AM | Last Updated: Dec 06 2017 1:48AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्यातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांमध्ये केवळ इंग्रजी व हिंदी भाषेचाच वापर केला जातो. मात्र यापुढे मराठीचा वापरही बंधनकारक करण्यात आला असून मंगळवारी सरकारने अध्यादेश काढून निर्देश दिले.   

सर्व पत्रव्यवहारांमध्ये, संदेशवहनांसह व्यवहारांमध्ये आणि संवाद साधताना, जनतेच्या माहितीसाठी लावल्या जाणार्‍या सूचना, जाहीर सूचना, फलक, नावाच्या पाट्या मराठी भाषेत असल्या पाहिजेत. राज्यात पुरवल्या जाणार्‍या ऑफलाईन व ऑनलाईन सेवांमध्ये सुध्दा मराठी भाषेचा वापर करण्याचे निदेश दिले आहेत. 

राजभाषा अधिनियम 1964 व सुधारणा अधिनियमा 2015 नुसार मराठी ही राज्याची राज्यभाषा असून तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य आहे. मात्र केंद्र सरकारच्या कार्यालयांना या राजभाषाचा विसर पडला होता. त्रि-भाषा सूत्राच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाने प्रादेशिक भाषांचा वापर करण्याबाबत 18 जून 1977 व 1 जुलै 2010 रोजी स्वतंत्र कार्यालयीन आदेशांन्वये निर्देश 
दिले होते.