Tue, Jul 07, 2020 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावी, दादरसह माहीमला कोरोनाचा सर्वाधिक फटका

धारावी, दादरसह माहीमला कोरोनाचा सर्वाधिक फटका

Last Updated: May 31 2020 12:50AM
मुंबई : पुढारी डेस्क

मुंबईत महापालिकेअंतर्गत एकूण 24 वार्ड असून त्यात 35 हजाराच्यावर कोरोनाबाधीत आहेत. त्यातील 11 वॉर्डमध्ये सर्वाधिक 23 हजार 193 बाधीत आढळले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. यात धारावी, दादरसह माहीम ज्या वॉर्डमध्ये आहे, त्यास कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 1 हजार 437 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 36 हजार 710 झाली आहे. तर महाराष्ट्रात 2 हजार 682 नवे रुग्ण आढळले असून 116 मृतांची नोंद झाली आहे. एकूण बाधितांची संख्या 62 हजार 228 झाली असून आजवर 2 हजार 98 जणांचा जीव गेला आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनूसार सहा  (जीएन, ई, एफएन, एल, एचई आणि केडब्ल्यू) वॉर्डात शुक्रवारअखेरपर्यंत 2 हजार पेक्षा अधिक मृत्यू नोंदले गेले आहेत.

जी दक्षिणमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात दादर, माहिम आणि धारावीचा समावेश आहे. या विभागात 28 मे पर्यंत 2 हजार 816 रुग्णांची नोंद झाली आहे.ई वार्डमध्ये येत असलेल्या मदनपुरा, माझगांव, भायखळा, मुंबई सेंट्रल आणि नागपाडा या विभागांचा समावेश असून येथे 2 हजार 487 रुग्ण नोंदले गेले आहेत. वडाळा, माटुंगा, आणि अँटॉप हिल हे एफ वॉर्ड मध्ये येत असून येथे 2 हजार 456 रुग्ण आढळले आहेत.

एम पूर्व वॉर्डमध्ये गोवंडी आणि शिवाजीनगर येत असून येथे 1 हजार 761 रुग्ण सापडले आहेत. जी वॉर्डमध्ये वरळी आणि प्रभादेवी, तर के पश्चिम मध्ये अंधेरी पूर्व, वर्सोवा, इर्ला, जुहू, ओशिवरा आणि जोगेवश्वरीचा काही भाग येतो. एल वॉर्डमध्ये कुर्ला आणि जोगेश्वरीचा समवेश असून येथे अनुक्रमे 1 हजार 900 रुग्ण सापडले आहेत.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनूसार बोरिवली आणि दहिसरमध्ये अन्य भागाच्या तुलनेत फारच कमी म्हणजे 350 रुग्ण आढळले आहेत. तर बी वॉर्डमध्ये 460 आणि  सी वॉर्डमध्ये 401 रुग्ण सापडले आहेत.