होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवली महापालिकेवर पुन्हा महिलाराज!

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर पुन्हा महिलाराज!

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:52AMकल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या नाट्यमय निवडणुकीवर अखेर सामंजसपणे शिवसेना-भाजपा युतीने पडदा पाडला. महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे यांची तर उप महापौरपदी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. 

सेनेच्या कोकणकन्या विनिता राणे यांना पालिकेच्या तेराव्या महापौरपदी तर भाजपाच्या उपेक्षा भोईर पंधराव्या उप महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे केडीएमसीच्या इतिहासात दोन्ही महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान झाल्या आहेत. 

शिवसेनेने आजमितीपर्यंत सर्वात जास्त महिला लोकप्रतिनिधींना महापौर बनण्याचा मान दिला आहे. आजपर्यंतच्या 13 महापौरपैकी सेनेने सात महिला लोकप्रतिनिधींना महापौर बनण्याचा मान दिला. यामध्ये कल्याणच्या 4 तर डोंबिवलीच्या 3 महिला लोकप्रतिनिधींना महापौरपदाची संधी मिळाली आहे.

Tags : Kalyan-Dombivali Municipal Corporation, Mahilaraj again,