Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मराठी बिग बॉस’चा महेश मांजरेकर सूत्रसंचालक

बिग बॉसचं मराठमोळ रूप; सूत्रसंचालक म्हणून...

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतील सर्वात उत्कंठावर्धक बिग बॉस कार्यक्रम आता आपल्या मराठीत सुरु होतो आहे. येत्या 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर बिग बॉसचं हे मराठमोळं रुप बघायला मिळणार आहे. मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच काही विशेष प्रोमोमधून मांजरेकरांची ही नवी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बिग बॉस चाहते है ! हे वाक्य जेव्हा कानावर पडते तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांंचेही लक्ष त्या आवाजाच्या दिशेने वळते आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता आपल्या मायबोलीत मराठीत घडणार आहे. 

बिग बॉस नेमक्या काय सूचना देईल, त्यासाठी काय खास वाक्य असतील, त्याचा आवाज कसा असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच प्रश्‍न तयार झाले आहेत. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रधार. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणे तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचे काम सूत्रधार शनिवार रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. 

महेश मांजरेकर या क्षेत्रात अनेकांसाठी सच्चे मित्र आहेत, काहींसाठी गुरु आहेत, काहींसाठी गॉडफादर. त्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढे प्रेम आहे तेवढाच आदरही आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आता प्रेक्षकांना बिग बॉसमधून बघायला मिळतील. बिग बॉसच्या या घरात किती सदस्य असतील कोण कोण असतील त्यांच्यामध्ये काय काय घडेल या प्रश्‍नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Tags : Mahesh Manjrekar, Marathi, Big Boss, Director, mumbai news