Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्रीकृत बिलिंगमुळे महावितरण होणार अधिक गतिमान : श्रीकांत जलतारे

केंद्रीकृत बिलिंगमुळे महावितरण होणार अधिक गतिमान : श्रीकांत जलतारे

Published On: May 11 2018 9:00PM | Last Updated: May 11 2018 8:59PMभांडूप/मुंबई : प्रतिनिधी

'केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे महावितरण अधिक गतिमान होणार असून, महावितरणच्या महसुलात वाढ होणार आहे. तसेच ग्राहकांना अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. याकरता फिल्ड वरील कर्मचाऱ्यांनी अधिक सुसूत्र पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. कामात हयगय करणाऱ्यांची गय गेली जाणार नाही,' अशा सूचना कार्यकारी संचालक (बिलिंग व वसुली) श्रीकांत जलतारे यानी दिल्या. भांडुप नागरी परिमंडळात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे व भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या.

यावेळी श्रीकांत जलतारे म्हणाले, 'केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे आता ग्राहकांच्या रीडिंगचा सर्व डेटा मुख्यालयातील सर्वरला सेव्ह होऊन तेथूनच त्याच्यावर अचूक बिलिंग होण्याकरिता पुढील प्रोसेसिंग होणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, बिलाच्या वसुली प्रकियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. याचबरोबर ग्राहकांना योग्य बिलिंग होण्याकरता इलेक्ट्रोमॅग्नेटीक व नादुरुस्त मीटर लवकरात लवकर बदलावेत. यामुळे वीज हानी कमी होऊन महावितरणच्या महसूलात वाढ होणार आहे. 

यावेळी कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वीज विक्री वाढ होण्याच्या दृष्टीने अनुषंगिक सूचना केल्या. तर मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी भांडूप नागरी परिमंडळाच्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी ठाणे नागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वाहणे, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, ग्राहक सेवा केंद्राच्या अधीक्षक अभियंता साधना खांडेकर, उपमहाव्यवस्थापक(मा.तं.) योगेश खैरनार, भांडूप विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश थूल, मुलुंड विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका खोब्रागडे, ठाणे १ विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र हरळकर, ठाणे २ विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक थोरात, ठाणे ३ विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण अन्नछत्रे, नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता अजितकुमार तांबडे, प्रणाली विश्लेषक अर्चना प्रेमसागर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले तसेच भांडूप नागरी परिमंडळातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Tags : Mahavitaran, Executive Director Shrikant Jaltere,  mumbai bhandup