Fri, Apr 26, 2019 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसातला बॉडी बिल्डर चटका लावून गेला

पोलिसातला बॉडी बिल्डर चटका लावून गेला

Published On: May 11 2018 4:08PM | Last Updated: May 11 2018 4:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र पोलिस दलातील बॉडीबिल्डर हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस दलासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुळचे रजपूत असलेल्या हिमांशू रॉय  यांचा जन्म मुंबई शहरात झाला. येथीलच झेवियर्स महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले. हिमांशू रॉय यांनी आपल्या कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दोषी कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेत रॉय यांची महत्त्वाची भूमिका होती. 

याशिवाय दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा चालक आरिफवर झालेला गोळीबार, पत्रकार जे डे हत्या प्रकरण, विजय पालांडे यांचा सहभाग असलेलं दुहेरी हत्या प्रकरण, लैला खान हत्या प्रकरण, पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणचा त्यांनी छडा लावला होता. तसेच २०१३ मध्ये आयपीएलच्या मॅचफिक्सिंग प्रकरणातही त्यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली होती. अनेक हाय प्रोफाइल गुन्ह्यांचा उलगडा करणाऱ्या आणि गुंडांच्यात दहशत निर्माण करणाऱ्या निधड्या छातीच्या अधिकाऱ्याने कॅन्सरसमोर हार पत्करली. आपल्या उरलेल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मापदंड करण्याची क्षमता असताना त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पोलिस दलात न भरुन येणारी मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पोलिस तसेच राजकीय क्षेत्रातून उमटत आहे.   

Image result for Himanshu Roy

अशी होती हिमांशू रॉय यांची कारकिर्द  

-१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
- १९९१ मध्ये रॉय यांची पहिली पोस्टिंग मालेगावात
- बाबरी मशिद पाडल्यानंतर मालेगावातील परिस्थिती  हाताळत त्यांनी कर्तबगारी दाखवून दिली 
- १९९५ मध्ये नाशिक ग्रामिण पोलिस अधिक्षक  
- पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा 
- पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१, 
- २००४ ते २००७ या काळात नाशिक शहर पोलीस आयुक्त   
- २००९ मध्ये मुंबईत सहपोलीस आयुक्त म्हणून  नियुक्ती  
- त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपदावर नियुक्ती  
-  २०१० ते २०१४ अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय)  
- २०१४ मध्ये त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. 
 

वाचा :  माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या