Sat, Aug 24, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसतो : राम नाईक

उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसतो : राम नाईक

Published On: Feb 27 2018 9:47AM | Last Updated: Feb 27 2018 9:46AMखानिवडे : वार्ताहर

उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसत असून तेथील अनेक मोठ्या शहरांत महाराष्ट्रीयन कामानिमित्त आहेत. त्यांच्यासाठी राजभवनात प्रथमच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवनेरी ते लखनौ अशी 200 दुचाकींची रॅली भगवे फेटे मिरवत काढली. याचाच अर्थ उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसतो, असे माजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिले. सोमवारी (काल) स्व. सुरेश जोशी मंच व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नालासोपारा पश्‍चिमेतील भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिराच्या गणेश पार्क मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतकार आणि प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत रामभाऊंनी अनेक राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करून आपली मते नोंदवली. या दरम्यान, अनेकदा हशा पिकून टाळ्यांचा कडकडाट झाला तसेच मिश्किल प्रश्नांची सरबत्तीही झाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुलाखतीत रामभाऊ नाईक यांनी सडेतोड आणि निर्भीडपणे आपली मते मांडली. सावरकरांची पुण्यतिथी असल्याने त्यांना प्रथम प्रश्न म्हणून आपली भेट सावरकरांशी झाली होती का? या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यपाल ते म्हणाले. आपली सावरकरांशी भेटही झाली आणि आपण त्यांचे भाषणही ऐकले. आमदार, खासदार, मंत्री तसेच राज्यपाल म्हणून काम करताना राजकारण बाजूला ठेवता येते. मला जे काम सोपवले गेले ते मी प्रामाणिकपणे व सर्वांमध्ये मिळून मिसळून करतो. निवडून दिल्यानंतर मत देणारे, न देणारे, मतदानच न करणारे असा कोणताही भेदभाव न करता सर्वांचे भले कसे होईल याकडे लक्ष आपण लक्ष दिले, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.

उत्तर प्रदेशातही महाराष्ट्र दिसत असून अनेक मोठ्या शहरात महाराष्ट्रीयन कामानिमित्त आहेत. त्यांच्यासाठी राजभवनात प्रथमच महाराष्ट्रदिन मोठ्या उपस्थितीत साजरा करता आला. मोदींची पहिली भेट ते व मी संघाचे संघटनमंत्री असताना झाली, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. चित्रपट व नाटक पाहण्यास क्वचितच जातो, मात्र नाव विचारू नका. अभिनेता गोविंदाने निवडणुकीत केलेला पराभव अस्वस्थ करून गेला. मात्र, तरीही काम करतच राहिलो व शेवटपर्यंत करत राहीन, असे ते म्हणाले. संघर्ष व संपर्क ही दोन सूत्रे जीवन सफल बनवतात. असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.