Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1 जानेवारीपासून महाराष्ट्राचे आर्थिक वर्ष!

1 जानेवारीपासून महाराष्ट्राचे आर्थिक वर्ष!

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:10AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्राप्रमाणे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष सुरू करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली असून  विधिमंडळ अधिवेशनाचे वेळापत्रकही बदलणार असल्याचा पुनरुच्चार संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला. पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास मुख्यमंत्र्यांचीही सहमती असून अर्थसंकल्पीय अधिवेशन हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मुंबईत घेतले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

नागपूरमध्ये होणार्‍या हिवाळी अधिवेशनाऐवजी पावसाळी अधिवेेशन तेथे घेण्याचा विचार असल्याचे गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये पडणारी थंडी आणि पावसाळ्यात मुंबईत पडणारा पाऊस पाहता हा पर्याय असल्याचे सांगितले जात होते. मात्र, गिरीश बापट यांनी, केंद्र सरकारने आर्थिक वर्षाचे वेळापत्रक बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याने राज्य सरकारनेही त्यादृष्टीनेही हालचाली सुरू केल्याचे सांगितले. ते मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलत होते.