Thu, May 28, 2020 08:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान पुरस्कारांत महाराष्ट्र अव्वल

पंतप्रधान पुरस्कारांत महाराष्ट्र अव्वल

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील अधिकार्‍यांनी दिल्‍ली दरबारी आपला झेंडा फडकत ठेवला आहे. संपूर्ण देशभरातून विविध  निकषांच्या आधारे अधिकार्‍यांची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यामध्ये गेल्या 11 वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या 15  अधिकार्‍यांनी हा पुरस्कार पटकवला आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या निकषांवर या पुरस्कारासाठी निवड केली जाते. दरवर्षी 21 एप्रिल रोजी  नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून 2006 सालापासून हे पुरस्कार दिले जातात. 

शाहू शिक्षण अभियानाचा गौरव 

कोल्हापूर जिल्हा परिषदेतही 2006 साली जिल्हा परिषदांच्या शाळांतील गळती रोखून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख  यांनी राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण अभियान कार्यक्रम सुरू केला. त्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली. त्यावेळी देशमुख व महावीर माने यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

जळगाव जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविल्याच्या उपक्रमची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनाही 2008 साली हा पुरस्कार देण्यात आला. तर 2009 साली मलकापूर शहरासाठी 24 तास पाणी हा उपक्रम उल्लेखनीय ठरला. त्यासाठी जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र होलानी तसेच सदानंद भोपळे, यशवंत बसुगडे, उत्तम बगाडे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेत तत्कालीन आयुक्त विजय नहाटा यांनी राबविलेल्या शिक्षण प्रशिक्षण योजनेला 2009 चा पुरस्कार मिळाला होता. 2017 साली जालना जिल्ह्यात राबविलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Tags : Mumbai, PM award, Maharashtra top, Mumbai news,