Tue, Sep 17, 2019 18:16



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रशासकीय अधिकारी म्हैसकर दाम्पत्याला अपत्यप्राप्ती

सनदी अधिकारी म्हैसकर दाम्पत्याला अपत्यप्राप्ती

Published On: Aug 22 2018 12:50PM | Last Updated: Aug 22 2018 1:04PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील प्रसिध्द अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांना पुन्हा एकदा आपत्य प्राप्ती झाली आहे. सरोगसीच्या माध्यमातून मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरात जुळया मुलींचा जन्म झाला आहे. 

मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथने वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेने त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. आता सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुली त्यांच्या आयुष्यात आल्याने ही पोकळी भरून निघेल. 

मुलींच्या जन्माने आमच्या आयुष्यात चमत्कार झाला आहे, असे मनीषा यांनी सांगितले. डॉ.जतीन शहा या आयव्हीएफ तज्ञाची यासाठी मदत घेण्यात आली. सध्या या मुली रुग्णालयात असून शुक्रवारपर्यंत त्यांना घरी घेऊन जाता येईल.