होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाललैंगिक अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसरा

बाललैंगिक अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसरा

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 1:40AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

आठ वर्षांच्या चिमुरडीवर जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये झालेला सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या घटनेमुळे देशभर संताप उसळला असतानाच गेल्या दहा वर्षांत लहान मुलांवरील अत्याचारांत 500 टक्क्यांपेक्षा वाढ झाली असून यात देशात  महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असल्याचे धक्‍कादायक चित्र आहे.    

2006 मध्ये बाललैंगिक अत्याचाराची संख्या 18 हजार 967 होती. 2016 मध्ये ती 1,06,958 पर्यंत झाली आहे. या दहा वर्षांच्या कालावधीतील शेवटच्या चार वर्षांत जास्त वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एनसीआरबी) माहितीनुसार भारतातील लहान मुलांवर होणार्‍या अत्याचारात 2005 ते 2016 दरम्यान 14 टक्के वाढ झाल्याचे चाइल्ड राइट्स अँड यूच्या (क्राय)  संस्थेने अहवालात नमूद केले आहे.  

क्राइम्स अंडर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोस्को) कायद्यानुसार 2016 मध्ये लहान मुलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण एक तृतीयांश आहे. भारतात दर पंधरा मिनिटांनी लहान मुलावर अत्याचार होत असून बाललैंगिक अत्याचारांचे प्रमाण 18 टक्के  आहे.  पोस्को कायद्याअंतर्गत एकूण गुन्ह्यांपैकी अंदाजे 33 टक्के गुन्हे लहान मुलांशी संबंधित असतात. गेल्या पाच वर्षांत लहान मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांचे नोंदले गेलेले प्रमाण 300 टक्क्यांनी वाढले  आहे.

Tags : Mumbai, Maharashtra second, child abuse atrocities, Mumbai news,