Sun, Aug 18, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राची 36 रेल्वेस्थानके स्वच्छतेत अव्वल

महाराष्ट्राची 36 रेल्वेस्थानके स्वच्छतेत अव्वल

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी देशातील स्वच्छ रेल्वेस्थानकांचा अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील  एकूण 36 रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाने श्रेणी अ 1 मध्ये 7 वा क्रमांक पटकावत देशात पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. गुणांकनात सुधार झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणी अ 1 मध्ये मुंबई-सीएसटी स्थानकाने 9 व्या तर दादर रेल्वेस्थानकाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली  आहे.

स्वच्छ रेल स्वच्छ भारत अहवालांतर्गत देशातील 407 रेल्वेस्थानकांची नावे जाहीर करण्यात आली. यात श्रेणी अ 1 मध्ये एकूण 75 रेल्वेस्थानकांत  महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. श्रेणी अ मध्ये एकूण 332 रेल्वे स्थानकांत राज्यातील 26 अशा एकूण 36 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. दोन्ही श्रेणींमध्ये गुणांकनानी सुधार झालेल्या सर्वोत्तम 10 रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली असून अ 1 श्रेणीत मुंबई-सीएसटी स्थानकाने 9 वा तर  दादर रेल्वे स्थानकाने 10 क्रमांक मिळवला आहे. 

मुंबई-सीएसटी व दादर रेल्वेस्थानकांची मागील वर्षापेक्षा स्वच्छता यादीत सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षीच्या 679.1 गुणांहून मुंबई-सीएसटी रेल्वेस्थानकाने 893.4 अंकावर झेप घेत गुणांकनात सुधार झालेल्या अ 1 श्रेणीतील पहिल्या 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत 9 वे स्थान मिळवले आहे. दादर रेल्वेस्थानकाने गत वर्षीच्या 552.2 गुणांहून सुधार करत 913  गुण मिळवत याच श्रेणीतील  10 वा  क्रमांक पटकाविला आहे.

देशातील एकूण 75 रेल्वेस्थानकांची अ 1 श्रेणी मध्ये निवड करण्यात आली. यात पश्‍चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वेस्थानाकाने 7 क्रमांक मिळवत  पहिल्या 10 मध्ये जागा पटकाविली  आहे.  मुंबई सीएसटी, पुणे,नागपूर,लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर,ठाणे आणि कल्याण या रेल्वेस्थानकांचा यात समावेश आहे.