Tue, Apr 23, 2019 22:42



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राला एका संयमी मुख्यमंत्र्याची गरज : संजय राऊत 

महाराष्ट्राला संयमी मुख्यमंत्र्याची गरज : राऊत 

Published On: May 28 2018 12:23PM | Last Updated: May 28 2018 12:23PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

पालघर विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलेले असताना भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. आता शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राला एका संयमी मुख्यमंत्रयाची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे.  

‘महाराष्ट्राला एका संयमी मुख्यमंत्र्यांची गरज आहे. जो थंड डोक्याने फक्त राज्य व जनतेच्या कल्याणाचाच विचार करेल. आज महाराष्ट्रात सुडाचे प्रवाह वाहात आहेत’ असे ट्विट काल (२७ मे) ला संजय राऊत यांनी केले आहे. 

Image may contain: text

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपचा दाखला देत‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूपच अहंकारी आहेत. विरोधीपक्षांबाबत अशा भाषेचा वापर मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, आपण राजकारणात पाहिले आहे की, जेव्हा कुत्राही सत्तेत आल्यानंतर स्वत:ला वाघ समजायला लागतो, अशा कठोर शब्दात राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

काय आहे ऑडिओ क्लिपचे प्रकरण 

पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारसभेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त टेप ऐकवली होती. त्यावर ही टेप सेनेने मोडतोड करून ऐकविल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. संपूर्ण क्‍लिप ऐकविली असती तर ती ऐकविणारे तोंडावर पडले असते असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर काल, कूटनिती तसेच साम, दाम, दंड व भेदाचा अर्थ समजाऊन घेण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मराठी शिकायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर उत्तर देताना ‘हवे असेल तर सर्वकाही शिकवायला तयार आहे.  मी ती ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाला  दिली  आहे. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर माझ्यावर कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी त्यात छेडछाड केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी असे मुख्यमंत्री म्हणाले होते.