Sat, Sep 22, 2018 23:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई अर्धमॅरेथॉन : कोल्हापूरचा दीपक तिसरा (video)

मुंबई अर्धमॅरेथॉन : कोल्हापूरचा दीपक तिसरा (video)

Published On: Jan 21 2018 9:17AM | Last Updated: Jan 21 2018 10:53AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या धावपटूंनी चमक दाखवत छाप पाडली. पुरुषांमध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये पण मूळचा कोल्हापूरकर असलेल्या दीपक कुंभारने तिसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधवने पाहिले तर, मोनिका आथरे दुसऱ्या स्थानी राहिली.

अर्धमरेथॉनवर पुरुष गटात खऱ्या अर्थाने वर्चस्व राहिले ते आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे. त्यांच्या प्रदीप सिंगने पहिले तर, शंकर मान थापाने दुसरे स्थान मिळवले. महिलांमध्ये जमा खातूनने तिसरे स्थान पटकावले.

अर्धमॅरेथॉन निकाल : 

पुरुष अर्धमॅरेथॉन

१) प्रदीप सिंग : 1:05:42
२) शंकर मन थापा : 1:06:40
३) दीपक कुंभार : 1:06:54

महिला अर्धमॅरेथॉन

१) संजीवनी जाधव : 1:26:24
२) मोनिका आथरे : 1:27:15
३) जुमा खातून : 1:27:48