Mon, Aug 19, 2019 15:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र दिनी ८०० पोलिसांना पोलीस महासंचालक पदक

महाराष्ट्र दिनी ८०० पोलिसांना पोलीस महासंचालक पदक

Published On: Apr 25 2019 1:44AM | Last Updated: Apr 25 2019 1:42AM
नवी मुंबई : प्रतिनिधी

नक्षलवाद्यांविरुध्द केलेली कामगिरी, गुणवत्तापूर्ण सेवा, जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळ करणे, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई, बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करुन खटले कोर्टात दाखल करणे, 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख बजावणार्‍या 800 पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना येत्या 1 मे रोजी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, कोल्हापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक, लाचलुचपत विभाग, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपुर येथील पोलीसांचा या यादीत समावेश आहे. मुंबईचे डीसीपी मझूनाथ सिंगे, महेश्‍वर रेड्डी, राजा स्वामी, श्रीकांत परोपकारी, मोहन दहिकर, वसंत जाधव श्‍वेता खेडकर, सुदर्शन मुंढे, किरण पाटील, ठाणे एसीबीचे डीवायएसपी कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे , पीआय अश्विनी बिद्रे प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी एसीपी संगीता अल्फोन्सो यांचासह 800 पोलिसांचा  यामध्ये समावेश आहे.

नक्षलवादी भागात  सलग तीन वर्षे सेवा, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस ठाणे, गंभीर गुन्ह्यांची उकल, लाचखोराविरोधात कारवाई करून न्यायालयात आरोपींना शिक्षा होणे अशी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आणि 15 वर्ष सलग सेवेत कुठला ही गंभीर गुन्हा, शिक्षा, दंड, विभागीय चौकशी, कारणे दाखवा नोटीस नाही. अशाच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची या पदकासाठी निवड केली जाते.