Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासकीय निवासस्थानी विठ्ठल- रखुमाईच्या मूर्तीचे केले पूजन

बळीराजा सुखी होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रार्थना

Published On: Jul 23 2018 9:32AM | Last Updated: Jul 23 2018 9:53AMमुंबई : पुढारी ऑनलाईन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबियासह विठ्ठल- रखुमाईच्या मूर्तीचे पूजन केले.

यावेळी त्यांनी, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटवरून दिली आहे.

''आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, शासकीय निवासस्थानी विठ्ठल- रखुमाईची मनोभावे, भक्तीभावाने पूजा केली,'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (ता. शेणगाव) वर्षाताई आणि अनिल जाधव या शेतकरी दाम्पत्याला माऊलीच्या महापूजेचा मान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यापासून रोखण्याचा इशारा दिल्यामुळे त्यांनी पंढरपूर दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांनी शासकीय निवासस्थानी विठ्ठल- रखुमाईची पूजा केली.

 

राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥ pic.twitter.com/ytciaCSD4A

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2018