Thu, Apr 25, 2019 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर 

महाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर 

Published On: Jan 03 2018 4:28PM | Last Updated: Jan 03 2018 4:34PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीमा-कोरेगावमध्ये दोन गटात झालेल्‍या दगडफेकीच्या पाश्वर्भूमीवर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर हा भीगा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबद्दल शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटेयांच्यावर 302 कलमानुसार खटले दाखल करावेत तसेच त्यांना सरकारने अटक करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली.  

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर 

> काही हिंदू संघटना गोधळ निर्माण करत आहेत
> बंद यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार
> भिडे आणि एकबोटे यांच्यावर 302 कलमानुसार खटले दाखल करा
> भिडे आणि एकबोटे यांना सरकारने अटक करावी
> काही हिंदू संघटना अराजक माजवतायत

महाराष्ट्र बंदचे Live Updates