Fri, Feb 22, 2019 20:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महावितरणचा टोल फ्री नंबर बदलला; सेव्ह करून घ्या

महावितरणचा टोल फ्री नंबर बदलला

Published On: Apr 07 2018 5:37PM | Last Updated: Apr 07 2018 5:37PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

वीज कनेक्शन बंद असेल किंवा काही तक्रार असल्यास थेट महावितरणपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक सेवा दिल्या जातात. यापैकीच एक टोल फ्री क्रमांकाची सुविधा आहे. महावितरणचा टोल फ्री नंबर बंद करण्यात आला असून त्याऐवजी नवीन नंबर देण्यात आला आहे. हा नंबर सातही दिवस २४ तास हा नंबर सुरू असणार आहे. 

महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी यासाठी महावितरणने अनेकटोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

या नव्या क्रमांका व्यतिरीक्त महावितरणच्यावतीने ग्राहकांना 19120, 1800-102-3435 व 1800-233-3435 असे तीन टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
 

Tags : Maharashtra State Electricity Board, Toll Free Number, Contact Number, Maharahstra Government