Sat, May 25, 2019 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘स्टार रेटिंग’ उपक्रमामुळे हवेचे प्रदूषण आवाक्यात

‘स्टार रेटिंग’ उपक्रमामुळे हवेचे प्रदूषण आवाक्यात

Published On: Mar 24 2018 9:16PM | Last Updated: Mar 24 2018 9:19PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र शासनाने राज्यातील उद्योगांच्या कणासंबंधी पदार्थांच्या उत्सर्जनाबाबतचा पहिला वाहिला उपक्रम ‘स्टार रेटिंग’ या नावाने गेल्या जून महिन्यात सुरु केला होता. उदयोगांच्या वायू उत्सर्जनावर आधारित ‘स्टार रेटिंग’ देणारा हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे. अधिक वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना १ स्टार तर कमी वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना ५ स्टार देऊन वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवून ते कमी करण्यास मदत होईल या हेतूने या उपक्रमाची सुरुवात झाली. 

या उपक्रमाला चांगले यश मिळाले असून राज्यातील उद्योगांची पर्यावरणीय जागरूकता वाढत आहे. शिवाय पारदर्शकता आणण्यात ही मदत होत आहे. पर्यावरण नियंत्रण क्षेत्रात फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात क्रांती आणण्याची क्षमता या उपक्रमात आहे. या बाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एम.पी.सी.बी) सदस्य सचिव, डॉ. पी. अनबलगन म्हणाले,  महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. उद्योजक व अन् लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.

स्टार रेटिंग’ उपक्रम का अजून मोठा होईल आणि अधिक उद्योग यात लवकरच सहभागी होतील या करिता आमचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमाच्या विस्तार सोहळ्याप्रसंगी ५० उद्योगांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.  यापैकी १९ उद्योग १-स्टार, १० उद्योग २-स्टार आणि ९ उद्योग ५-स्टार असे आहेत. सर्व उद्योगांना त्यांच्या ‘स्टार रेटिंग’ बाबतची प्रगती पुस्तक एम.पी.सी.बी द्वारे देण्यात आली. जागतिक पातळीवर ‘स्टार रेटिंग’ सारखे अनेक कार्यक्रम अमेरिका, कॅनडा, चीन, घाना, फिलिपिन्स आणि युक्रेनसारख्या देशांमध्ये सुरु आहेत. पण वायु उत्सर्जन थेट परिणामाबाबतचा ‘स्टार रेटिंग’ हा एकमेव उपक्रम आहे. या उपक्रमात, अब्दुल लतीफ जमील पावर्टी लॅब (जे-पाल), एनर्जी पॉलिसी इनस्टीट्युट युनीवर्सिटी ऑफ शिकागो आणि एव्हीडेन्स फॉर पॉलिसी डीझाईन (ईपॉड) सारख्या संस्थाही या उपक्रमात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर सहभागी आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्तद आहे. वायू उत्सर्जनाचा सामान्य जनतेवर होणाऱ्या परिणामाच्या कठोर चाचण्या करून त्यांना वायु प्रदुषणाबाबत निर्णायक माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे ही एक वंदनीय मोहीम आहे. कमी खर्चात पर्यावरण नियंत्रण यशस्वीपणे पार पाडणे यात  एम.पी.सी.बी जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका पार पडत आहे, अशा शब्दांत  एपिक इंडिया या शिकागो महाविद्यालयाशी संबंध असलेल्या प्राध्यापक मायकल ग्रीनस्टोन यांनी ‘स्टार रेटिंग’चे कौतुक केले.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या ‘स्टार रेटींग’ कार्यक्रमात अंदाजे २०,००० औद्योगिक वायु उत्सर्जनाच्या नमुन्यांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकत आहे. औद्योगिक संस्था, शासन तसेच सामान्य जनता देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर (http://www.mpcb.info) जाऊन आपल्या विभागातील औद्योगिक संस्थांचे ‘स्टार रेटिंग’ पाहू शकतील. 

आपल्या विभागातील औद्योगिक संस्था सहज शोधण्यासाठी विभाग, क्षेत्र तसेच तारांकन या तीन विभागांचा आधार देखील घेऊ शकतील. जनतेने या उपक्रमात अधिक प्रमाणात सहभागी व्हावे म्हणून एनर्जी पॉलिसी इनस्टीट्युट अॅट युनीवर्सिटी ऑफ शिकागो (एपिक – इंडिया) या संस्थेने नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुण्या सारख्या शहरांमध्ये अनेक जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहेत. वायु प्रदूषणाबाबत लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल व्हावा वलोकांनी ‘स्टार रेटिंग’ वेबसाईटवर जाऊन अधिक जागरूकता दाखवावी हेच ह्या जनजागृती उपक्रमांचे ध्येय आहे.

 

Tags :  Maharashtra,  Pollution, Star Rating Programme,  Air Pollution