Thu, Jul 18, 2019 08:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेची भेट; पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळणार!

मनसेची भेट; पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त मिळणार!

Published On: May 30 2018 4:58PM | Last Updated: May 30 2018 4:58PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांना एक दिवसासाठी दिलासा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.

वाचा: Dear PM, १ पैशाची कपात हा बालिशपणा : राहुल गांधी

येत्या 14 जून रोजी मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसे सरकारमध्ये नसूनही 4 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.