Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Live : तिसऱ्या फेरी अखेर डावखरे आघाडीवर

Live : तिसऱ्या फेरी अखेर डावखरे आघाडीवर

Published On: Jun 28 2018 8:19AM | Last Updated: Jun 28 2018 7:42PMमुंबई/नाशिक : पुढारी ऑनलाईन

विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठीची मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदारांची आज निवड होणार आहे. 

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीला गुरुवारी सकाळी नेरूळच्या सेक्टर 24 मधील पाम बीच रोडवरील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन येथे सुरुवात झाली. निरंजन डावखरे यांचा भाजप प्रवेश आणि शिवसेनेने पहिल्यांदा निवडणूक लढविल्याने मुंबईपेक्षा कोकण पदवीधर मतदार संघाची सुभेदारी कोण मिळविणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी झाली. या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तसेच महसूल यंत्रणेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तींनाच फक्त या इमारतीत प्रवेश असणार आहे. पसंतीक्रम पद्धतीचे मतदान (एकल संक्रमणीय ) असल्याने उमेदवाराला विजयी होण्यासाठी विशिष्ट फॉर्म्युलाद्वारे आवश्यक कोटा निश्‍चित करण्यात येतो त्यानुसार सर्व उमेदवारांना मिळालेली मते मोजली जातात. 

मुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37237 मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी 52.81 एवढी आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील 75 हजार 439 मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी 72.35 आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघ अपडेट 

मुंबई पदवीधरमध्ये विलास विनायक पोतनीस याना 19354 मते, विजयाची अधिकृत घोषणा बाकी
 
सांस्कृतिक भवनाच्या पहिल्या मजल्यावर मुंबई शिक्षक तर दुसर्‍या मजल्यावर कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरची मतमोजणी होणार आहे. तुलनेने  कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुव्यवस्थित व वेगाने होण्यासाठी 28 टेबल्स मांडण्यात आले आहेत. याशिवाय यावेळेस काही सूक्ष्म निरीक्षक देखील मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत.

नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीला अंबड येथील वेअर हाउसमध्ये सुरुवात झाली. शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी 92.30 टक्के इतके मतदान झाले होते. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शिक्षक कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जादा मतदानामुळे निकाल हाती येण्यास रात्री उशीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणी अपडेट : 

फायनल फेरी
आकडेवारी 49769 हजार पैकी
बाद मते -1341
नोटा- 103
वैध मते- 47978
1) अनिकेत विजय पाटील, भाजप - 6329
2) अजित दिवटे, अपक्ष - 34
3) अमृतराव शिंदे , अपक्ष - 3209
4) अशोक पाटील , अपक्ष - 16
5) महादेव चव्हाण , अपक्ष - 24
6) दराडे किशोर, शिवसेना - 16886
7) पानसरे विठ्ठल , अपक्ष - 38
8) प्रताप सोनवणे, अपक्ष - 560
9) बाबासाहेब गांगुर्डे, अपक्ष - 51
10) भाऊसाहेब कचरे, अपक्ष - 5167
11) शालिग्राम भिरोड, अपक्ष - 3876
12) मुक्तार कासीम, अपक्ष - 59
13) रविंद्र पटेकर, अपक्ष - 179
14) विलास पाटील, अपक्ष - 266
15) सुनील पंडित, अपक्ष - 313
16) संदीप बेडसे, मित्रपक्ष - 10970

शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे आघाडीवर,
राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर. 

दराडे 5745 मतांनी आघाडीवर, आता 9 हजार मतांची मोजणी बाकी

शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे 13977

टीडीएफ संदीप बेडसे 8232

भाजप अनिकेत पाटील  4792

भाऊसाहेब कचरे 4753

आप्पासाहेब शिंदे 2982

प्रतापदादा सोनवणे 534
शिक्षक परिषद सुनील पंडित288

पहीली फेरी मते (आकडेवारी 20 हजार पैकी)

बेडसे यांना 3426 मते, दराडे यांना 7986तर  कचरे यांना 2875 मते पडली आहेत.

भाजपा उमेदवाराला 1945 मते पडली आहेत. तर बाद मते -633 नोटा-26 आणि वैध मते- 19341इतकी आहेत 

मते : प्रतापदादा सोनवणे-418, कचरे-2878, बेडसे-3427, अनिकेत पाटील (BJP)-1946, अमृत शिंदे-1537

दराडे आघाडीवर आहेत, अजून 29000 मते मोजणे बाकी आहे.

20 हजार मतांची मोजणी झाली, 633 अवैध 26 नोटा

उमेदवार निहाय मिळालेली मते :

शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे- 7924

टीडीएफ संदीप बेडसे 3427

भाऊसाहेब कचरे 2878

आप्पासाहेब शिंदे 1537

भाजप अनिकेत पाटील 1946

प्रतापदादा सोनवणे 418

शिक्षक परिषद सुनील पंडित 146
 

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक निकाल अपडेट : 

कोकण शिक्षक मतदार निवडणूक 

28000 मतांची मोजणी 

 भाजप १०३०४, शिवसेना ९४९४, राष्टवादी ६५००

संजय मोरे, शिवसेना पहिल्या फेरीत 2 हजाराहून अधिक मतांनी पुढे

कोकण विधानपरिषद  निवडणूक निकाल अपडेट : 

भाजप उमेदवार निरंजन डावखरे ८६४ मतांनी आघाडीवर 
 

रिंगणातील प्रमुख उमेदवार 

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अनिकेत पाटील (भाजपा), किशोर दराडे (शिवसेना पुरस्कृत), संदीप बेडसे (राष्ट्रवादी व टीडीएफ बोरस्ते - मोरे गट पुरस्कृत, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे व भाऊसाहेब कचरे पाटील (टीडीएफ-निरगुडे बादशहा गट), सुनील पंडित (शिक्षक परिषद), शाळीग्राम भिरुड या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे.