Wed, Feb 20, 2019 19:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

Published On: Jun 02 2018 8:36PM | Last Updated: Jun 02 2018 8:36PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अभियांत्रिकी, औषदनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीसीबी गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर पीसीएम गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग पहिला आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थांना 3 जून रोजी त्यांच्या लॉग इन मध्ये पाहता येणार आहे.

►निकाल पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा

पीसीबी गटात जानवी मोकाशी 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम आली आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हिने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.