Fri, Apr 19, 2019 13:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच श्रीदेवींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच श्रीदेवींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. दुबईत मृत्यू झाल्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबाबात अनेक तर्क वितर्क रंगले. त्यानंतर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार झाल्याबद्दलच्या चर्चेलाही उधाण आले. 'पद्मश्री' असल्यामुळे श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचा तर्क काढण्यात आला. पण आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, श्रीदेवींवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार झाल्याचे समोर आले आहे.  

प्रत्यक्षात शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, श्रीदेवीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेल्याची बाब स्पष्ट झाली.  २२ जून २०१२ ते २६ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रात ४० व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आहेत. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात झालेले अंत्यसंस्कार आणि याबाबतच्या अधिकारांबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली होती. मुख्यमंत्री प्रमुख असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार खात्याने अनिल गलगली यांस कळविले की, शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याबाबत २५ फेब्रुवारी २०१८ ला मुख्यमंत्री सचिवालयाकडून मौखिक निर्देश प्राप्त झाल्यानुसार,  २६ फेब्रुवारी २०१८ च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांस कळविण्यात आले होते. 

या माहितीनंतर अनिल गलगली म्हणाले की,  श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  पद्मश्री मिळाल्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचे बोलले जात होते. पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात का? यासाठी माहिती विचारली होती. मात्र, याची पुष्टी झाली नाही उलट हे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची नवीन माहिती समोर आली.

Tags : Maharashtra, Chief Minister, Devendra Fadnavis, Sridevi, Sridevi Funeral, Sridevi Wrapped In Indian Flag 


  •