Sat, Jan 19, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई बाजारसमितीला बंदचा फटका

नवी मुंबई बाजारसमितीला बंदचा फटका

Published On: Jan 03 2018 10:18AM | Last Updated: Jan 03 2018 10:30AM

बुकमार्क करा
नवी मुंबई :  राजेंद्र पाटील 

भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. या घटनेनंतर आज (बुधवार, ३ जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बंदची घोषणा केली. या घोषणेचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये दिसून आला. 

मंगळवारी रात्री १० ते बुधवारी आज सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ ५७१ गाड्यांची आवक झाली. तर मुंबईसह उपनगरात केवळ २६० भाजीपालाच्या गाड्या पाठविण्यात आल्या. रोज सुमारे ७५० गाड्यांची मुंबईला जावक होत होती. यामुळे मुंबईत आज बंदचा फटका व्यापारी, शेतकरी, किरकोळ विक्रेते, वाहनचालकांना बसला आहे. दुपारनंतर हा भाजीपाला खराब झाल्यानंतर फेकण्याची वेळ व्यापा-यांवर येण्याची दाट शक्यता आहे. 

पुणे, सातारा,सोलापूर,नगर,नाशिकसह इतर जिल्ह्यातून एपीएमसीतील घाऊक बाजारात आवक होते. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर मसाला, दाणा, भाजी,फळ आणि कांदा घाऊक बाजारात त्याचा परिणाम जाणवू लागला. मसाला व दाणा बाजारातून संध्याकाळी ८० ते ९० गाड्या मुंबईत गेल्या. आज दुस-यादिवशीही हीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले.  पणन विभागाने आजची आवक व जावकची  माहिती मुंबई एपीएमसी कडून  मागवली आहे.