Fri, Sep 20, 2019 06:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाजनादेश यात्रा बुधवारपासून पुन्हा सुरू

महाजनादेश यात्रा बुधवारपासून पुन्हा सुरू

Published On: Aug 18 2019 1:43AM | Last Updated: Aug 18 2019 1:43AM
मुुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात आलेल्या महापुरामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंडित झालेल्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून (दि. 21 ऑगस्ट) सुरू होत आहे. नंदुरबार ते सोलापूर असा हा दुसरा टप्पा आहे.  11 दिवसांच्या या यात्रेत 14 जिल्ह्यांतील 55 विधानसभा मतदारसंघांत ते  जाणार आहेत.

महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरू होणार होता. तो आता 21 ते 31 ऑगस्ट असा राहील. उत्तर महाराष्ट्रतील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, विदर्भातील बुलढाणा, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या 14 जिल्ह्यांतील 55 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाईल. मुख्यमंत्री या टप्प्यात एकूण 1 हजार 839 किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex