Mon, Apr 22, 2019 05:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडः कौटुंबिक वादातून एकाची हत्या  

महाडः कौटुंबिक वादातून एकाची हत्या  

Published On: May 02 2018 10:09AM | Last Updated: May 02 2018 10:09AMमहाडः प्रतिनिधी 

महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या साकडी या गावी कौटुंबिक वादातून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण १३ जणांना ताब्यात घेतले आहे.   

साकडी येथील मोहिउद्दीन अहमद कासिम हुरजुक (वय ५८) यांचे घरातील नातेवाईकांसमवेत जमिनीच्या मालकीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. काल रात्री बाचाबाची होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले, यामध्ये मोहिउद्दीन हुरजुकची हत्या करण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन संबंधित मुख्य आरोपीसह तेरा जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

Tags : Mahad, One killed, family dispute, raigad, mumbai news