Wed, Apr 24, 2019 00:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महावितरणचे साडेचार हजार कोटी पालिकांनी थकविले

महावितरणचे साडेचार हजार कोटी पालिकांनी थकविले

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:28AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

राज्यातील महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक पाणी योजना व  पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल 4 हजार 538 कोटी रुपये थकवले आहेत.  ही वसुली करण्यासाठी   आता त्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या  रक्कमेतून थकबाकीची निम्मी  रक्कम  परस्पर वळती केली जाणार आहे. राज्य सरकारने तसे आदेश दिले आहेत. 

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती या त्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तसेच  पथदिव्यांना महवितरणकडून वीजपुरवठा केला जातो. सप्टेंबर 2017 अखेर या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणचे थोडेथोडके नव्हे तर 4 हजार 538 कोटी 47 लाख रुपये थकले आहेत. या वसुलीसाठी प्रयत्न करूनही ती होत नाही व पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न असल्याने त्यातुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती असल्याने वीजपुरवठाही खंडित करता येत नाही. जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामपंचायतींकडील वसुलीसाठी याच नियमाने ग्रामविकास विभागाला थेट अनुदानातून रक्कम वळती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.