Tue, Oct 22, 2019 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मधुकर जोशींना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार जाहीर

मधुकर जोशींना 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार जाहीर

Published On: Jul 12 2019 7:01PM | Last Updated: Jul 12 2019 6:26PM
मुंबई : प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये ५ लाख रूपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशी दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

श्री मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे.

नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३,५०० मराठी हस्तिलिकाहीखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.