Fri, Jul 19, 2019 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ST Strike : काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

ST Strike : काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

Published On: Jun 08 2018 11:33AM | Last Updated: Jun 08 2018 1:44PMठाणे  - प्रतिनिधी  

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरु केल्याने प्रवासांचे आतोनात हाल होत आहेत. राज्यातील विविध भागात कर्मचारी संपात उतरले आहते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील एस. टी वाहतूक सुरळीत सुरु होती. ठाणे आणि भिवंडी आगारातून ५० टक्के वाहतूक सुरु असल्याची माहिती सुत्रा़नी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून सुरू झालेला संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही. त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.  ठाणे जिल्ह्यातील वाडा, शहापुर, मुरबाड आगारातून सकाळच्या बस सुटल्या. मात्र ठाणे येथून सुटणाऱ्या पनवेल, बोरिवली, भाईंदर  या जिल्हयातंर्गत होणाऱ्या वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

वाचा : एसटी संप Live : नांदेडमध्ये संपाला हिंसक वळण

- पोलिस बंदोबस्तात कोल्हापूर- पुणे मार्गावर दोन शिवशाही गाड्या सोडण्यात आल्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

-एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा_

-पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी._

-जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत