Sat, Jul 20, 2019 09:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाटलीबंद पाणी विक्रीवर ‘एमआरपी’चे बंधन नाही

बाटलीबंद पाणी विक्रीवर ‘एमआरपी’चे बंधन नाही

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:33AM

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था 

बाटलीबंद पाणी एमआरपी किमतीवरच विकण्याचे बंधन हॉटेल, तसेच विक्रेत्यांना घालू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यामुळे ग्राहकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.

बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर लीगल मेट्रोलॉजी अ‍ॅक्टमधील तरतुदी लागू होत नाहीत, त्यामुळे एमआरपीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणारा शिक्षेस पात्र ठरू शकत नाही, असे न्या. आर. एफ. नरीमन यांच्या पीठाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने याचिका दाखल केली होती. त्याला उत्तर देताना, लीगल मेट्रोलॉजी अ‍ॅक्टनुसार बाटली बंद पाणी एमआरपीपेक्षा जास्त किमतीस विकणे शिक्षेस पात्र ठरू शकते, असे शपथपत्र ग्राहक मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. एमआरपीपेक्षा जास्त किमत घेऊन बाटली बंद पाणी विक्री केल्याने सरकारचा सेवा कर, तसेच उत्पादन शुल्काचा महसूल बुडतो, असा दावा केंद्र सरकारने केला होता.

या पार्श्‍वभूमिवर सरकारची भूमिका फेटाळत सुप्रिम कोर्टाने बाटलीबंद पाणी हॉटेलचालक त्यांना हव्या त्या किमतींना विकू शकतात, असा निर्वाळा दिला. याचा अर्थात मोठा फटका ग्राहकांना बसणार असून, हॉटेलात पाण्याची बाटली घेताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.