Tue, Feb 19, 2019 04:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार राजन विचारे यांना मातृशोक

खासदार राजन विचारे यांना मातृशोक

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:40AM

बुकमार्क करा
ठाणे :

शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या मातोश्री  पुष्पा बाबुराव विचारे  यांचे सोमवार 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता वयाच्या 91 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्‍चात  त्यांचा मुलगा खासदार राजन बाबुराव विचारे, प्रमोद तसेच मुली उषा चव्हाण, मंदा कदम, सुषमा सुर्वे,  मीना प्रभू, त्यांच्या सुना नगरसेविका नंदिनी राजन विचारे, प्रिया प्रमोद विचारे व  नातवंडे माजी नगरसेवक मंदार विचारे, लतिषा राजन विचारे, धनश्री राजन विचारे असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा  डी अल्मेडा अपार्टमेंट चरई येथील राहत्या घरून  मंगळवार  2 जानेवारीला सकाळी 10 वाजता निघेल.