Mon, Oct 21, 2019 02:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ख्रिश्चन समाजबाबतच वक्तव्यावरुन गोपाळ शेट्टींचा 'ना'राजीनामा?

ख्रिश्चन समाजबाबतच वक्तव्यावरुन गोपाळ शेट्टींचा 'ना'राजीनामा?

Published On: Jul 06 2018 3:41PM | Last Updated: Jul 06 2018 3:41PMमुंबई : प्रतिनिधी

भारतातील ख्रिश्चन समाजच देशाचा स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं, अस वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना भोवण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्या संदर्भात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत  फटकरल्याने नाराज झालेल्या शेट्टी यांनी मला पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, महत्वाचं असल्याचे सांगत खासदरकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र तूर्तास प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टोकाचा निर्णय घेऊ नका, असा सल्ला त्यांना दिला आहे.

भाजप उत्तर मुंबईचे खासदार असलेले गोपाळ शेट्टी यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या ही एक फॅशन झाल्याचे वक्तव्य करत अकारण वाद ओढवून घेतला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात शेट्टी यांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन समाजाचा कोणताही सहभाग नव्हता असे वक्तव्य केले. यामुळे ख्रिश्चन समाज तसेच राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. शेट्टी यांच्या विरोधात निदर्शने करताना भाजपा नेतृत्वाला प्रामुख्याने लक्ष केले जात आहे. त्यामुळे  पक्षनेतृत्वाने देखील याची गंभीर दखल घेत त्यांना चांगलीच समज दिली आहे.

दरम्यान शेट्टी यांनी, मला कोणत्याही पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि प्रिय आहे. जे पद मला माझ्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असेल असे पद मला नको आहे. आपण केलेल्या वक्तव्याबाबत पक्षाने कारवाई करण्याची वाट पाहणार नाही, असं सांगत खासदरकीचा राजीनामा देऊन पदावरून दूर होण्याची तयारी दर्शविली आहे. आपण केलेल्या एखाद्या वक्तव्याने भाजपचे कोणतंही नुकसान होऊ नये ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या मालवणीत शिया कब्रस्तान कमिटीमार्फत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शेट्टी यांनी भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नव्हता असं वक्तव्य शेट्टी यांनी केलं आहे. याबाबतचा त्यांचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे. या वादग्रस्त वक्तव्याबाबत दोन व्यक्तींनी खासदार शेट्टी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19