Tue, Nov 19, 2019 12:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जनतेचा आशीर्वाद मंत्रिपदापेक्षा मोठा : खा. गोपाळ शेट्टी

जनतेचा आशीर्वाद मंत्रिपदापेक्षा मोठा : खा. गोपाळ शेट्टी

Published On: Jun 17 2019 2:11AM | Last Updated: Jun 17 2019 1:07AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेने दिलेला आशीर्वाद हा मंत्रिपदापेक्षा मोठा असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळविल्याबद्दल, भाजपा मागाठाणे विधानसभा क्षेत्राच्या वतीने खासदार गोपाळ शेट्टी यांचा भव्य नागरी सत्कार भाजपा सचिव आमदार प्रवीण दरेकर व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोतीभाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. 

सत्काराला उत्तर देताना, खा. गोपाळ शेट्टी म्हणाले, मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील व केंद्राशी संबंधित विषय आपण सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावू. मोदींवर विश्‍वास व्यक्त करत जनतेने जो जनाधार दिला आहे तो टिकविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. जनतेच्या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सतत काम करीत रहा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

यावेळी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सर्वस्पर्शी कामाचा गौरव केला. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता, जनतेशी नाळ जोडलेला, जमिनीवरचा, सर्वसामान्यांचा नेता, अशा शब्दांत त्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. 

मागाठाणेचे विविध प्रलंबित सर्व प्रश्‍न खासदार गोपाळ शेट्टी, पालकमंत्री विनोद तावडे, तसेच सेना-भाजप लोकप्रतिनिधी व सरकारच्या  माध्यमातून सोडविले जातील, असा विश्‍वासही आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेवक गणेश खणकर, अ‍ॅड. शिवाजी चौगुले व शिवसेना नगरसेविका गीता सिंघन यांची भाषणे झाली. 

राज्य शासनाच्या स्वयंपुनर्विकास उच्चस्तरीय समितीवर मतज्ञ सदस्य  म्हणून आमदार प्रवीण दरेकर यांची निवड झाल्याबद्दल, तसेच प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रीतम पंडागळे, तर गृहनिर्माण कायदा समितीवर मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांची निवड झाल्याबद्दल, या तिघांचा सन्मान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. 

याप्रसंगी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मोतीभाई देसाई, नगरसेविका सुनीता यादव, सुरेखा पाटील, मुंबई सचिव अशोक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, जिल्हा महामंत्री बाबा सिंग, गौतम पंडागळे, अ‍ॅड. शिवाजी चौगुले, निषाद कोरा, युवा मोर्चाचे  अध्यक्ष अमित उतेकर, संदीप उपाध्याय, शिवसेना उपविभागप्रमुख सुनील डहाळे, अशोक म्हामूणकर, चेतन कदम उपस्थित होते.