Sat, May 25, 2019 22:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्वपक्षीय संविधान बचाव रॅलीत काँग्रेस सहभागी होणार : चव्हाण  

सर्वपक्षीय संविधान बचाव रॅलीत काँग्रेस सहभागी होणार : चव्हाण  

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:22AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

देशातले आणि राज्यातल्या सत्ताधारी भाजपा या देशाचे संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे. याविरोधात 26 जानेवारीला सर्वपक्षीय बचाओ रॅली निघणार असून काँग्रेस पक्षदेखील या रॅलीत सहभागी होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान बचाओ रॅली काढण्यात येणार, असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.  संविधान बचाओ रॅलीला उत्तर म्हणून भाजप तिरंगा रॅली काढणार आहे. भाजपाची पितृसंस्था असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  देशाचा राष्ट्रध्वज तीन रंगाचा असणे अशुभ असल्याचे सांगत राष्ट्रध्वजचा अवमान केला आहे. संघ मुख्यालयात गेली अनेक वर्ष ज्यांनी तिरंगा फडकावला नाही. तेच लोक संविधान बचाव रॅलीच्या विरोधात तिरंगा रॅली काढतायेत हे हास्यापद असल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.  

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. या बैठकीत सातारा येथील भाजप युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.