Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेला धक्का; शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार 

मनसेला धक्का; शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार 

Published On: Jun 10 2018 5:11PM | Last Updated: Jun 10 2018 5:15PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज ठाकरे यांच्या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्‍का बसणार आहे. मनसे नेते शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. १९ जून रोजी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्‍याची माहिती समोर आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका लक्षात घेता शिंदे यांच्या प्रवेशाचा मनसेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

याआधीच मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश आहे. कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गळती लागलेल्या मनसेसाठी शिंदे यांच्या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून शिशिर शिंदे नाराज असल्याचे वृत्त होते.