Thu, May 28, 2020 18:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता मनसेकडून ईडीला जाहीर नोटीस!

आता मनसेकडून ईडीला जाहीर नोटीस!

Published On: Aug 23 2019 9:10PM | Last Updated: Aug 23 2019 9:10PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (ता.२३) अंमलबजावणी संचलनालयाकडून तब्बल साडे आठ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. मात्र, राज यांनी कार्यकर्त्यांना संयमाने घेण्याचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत राहिले. 

मात्र मराठी फलकावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईतील ईडी कार्यालयाचा फलक मराठीमध्ये करण्यासाठी आता मनसेने थेट नोटीस धाडली आहे. ईडी कार्यालयाचा फलक मराठीत करण्यासाठी मनसेने नोटीस धाडली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

मनसे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का? अशी विचारणा मनसेने केली आहे. ईडी कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर हिंदीत प्रवर्तन निदेशालय असं लिहिण्यात आलं आहे. तसंच त्याखाली इंग्लिशमध्ये Enforcement Directorate असे लिहिण्यात आले आहे.

मनसेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरले आहे, पण आम्ही याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आणि ह्या नोटीशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? 

मनसेने मराठी पाट्यांसाठी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. दुकानांवरील इंग्रजी, गुजराती तसेच इतर भाषांमधील पाट्या हटवून मराठीमध्येच असावीत यासाठी मोहिमच हाती घेतली होती.