होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेचे दिवा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन (Video)

मनसेचे दिवा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन (Video)

Published On: Jun 30 2018 2:08PM | Last Updated: Jun 30 2018 1:59PMठाणे : प्रतिनिधी

गेल्या ५ दिवसांपासून दिव्यातील बेडेकर नगर, दातीवली तलाव परिसरात वीज खंडित आहे. यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. याच्या निषेधार्थ दिवा परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन सुरु केले आहे. 

वीज नसल्याकारणाने पाणी नाही, वेळेवर जेवण नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराच्या निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नागरिकांसमवेत धरणे आंदोलन करत आहेत.