Fri, Jul 10, 2020 20:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

Last Updated: May 25 2020 12:23PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कोट्यवधी मजूर मुंबईसह राज्यात रोजगार करून उपजीविका करत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे अनेक परप्रांतीय मजूर घरी परतले आहेत. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयाने महाराष्ट्रात पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : अखेर ६० दिवसांनी विमानतळांवर कलकलाट; देशांतर्गत विमानसेवा झाली सुरु

उत्तर प्रदेशमधील मजुरांना कामावर ठेवायचे असेल, तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. सीएम योगींनी तसा निर्णय घेतला असेल तर, महाराष्ट्रात येतानाही आमच्या महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय घेता येणार नाही हे आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात राज यांनी सुनावले आहे.  

Image

अधिक वाचा : 'लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही'

राज आपल्या निवेदनात पुढे म्हणतात की, राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांर्भियाने लक्ष द्याव. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रान पाळावा.   

अधिक वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांची ५० हजारी पार; एकट्या मुंबईत तब्बल ३० हजार, मागील २४ तासात सापडले ३ हजार!