Wed, Aug 21, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने केले कोकण पदवीधर मतदारसंघ 'डाव' खरे

भाजपने केले कोकण पदवीधर मतदारसंघ 'डाव' खरे

Published On: Jun 29 2018 7:52AM | Last Updated: Jun 29 2018 7:52AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

कोकण पदवीधर मतदारसंघांतून अखेर भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहे. शिवसेनेचे संजय मोरे यांच्याशी त्यांची खरी लढत झाली. शुक्रवारी पहाटे पावणे सात वाजता डावखरे विजयी झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश पाटील यांनी केली.  

नजीब मुल्ला यांची 14,821 मते ट्रान्सफरसाठी घेतल्यानंतर त्यातील 987 मते निरंजन डावखरे यांना तर 1269 मते संजय मोरे यांना मिळाली. 12,566 मते एक्झॉस्ट झाली.  पहाटे 4.15 वाजता शेवटच्या फेरीत सर्व 12 उमेदवार बाद फेरीत बाद झाल्यावर दुसऱ्या क्रमांकवरील संजय मोरे यांची 24704 मते ट्रान्सफरसाठी घेण्यात आली. त्यातील 2640 मते निरंजन डावखरे यांना मिळाली तर  22064 मते एक्झॉस्ट झाली. त्यामुळे निरंजन डावखरे यांच्या मतांचे मूल्य 32831 इतके झाले. विजयासाठी आवश्यक कोटा 35143 इतका आहे, मात्र ते रिंगणात उरलेले एकमेव उमेदवार आहेत. हा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी जाहीर केले. आयोगाच्या निर्णयानुसार अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. निरंजन डावखरे विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या अनुमतीनंतर सकाळी पावणे सात वाजता घोषणा झाली.